ग्रामरोजगार सेवक संघटनेचे प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्रामरोजगार सेवक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्यध्यक्ष बाळासाहेब तायडे यांच्या नेतृत्वाखाली व तालुका अध्यक्ष दिपक कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल पंचायत समितीच्या आवारात ग्रामरोजगार सेवकांच्या आपल्या विविध मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणीक उपोषण करण्यात येत आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात ग्रामरोजगार सेवक १५ वर्षांपासून प्रामाणिकपणे मनरेगाची सर्व कामे करीत आहे. त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी कधीच वेळेवर नियमानुसार मानधन, प्रवास भत्ता, अल्पोहार तसेच प्रोत्साहन भत्ता देखील मिळणार नाही. अनेक वेळा निवेदने देऊनही कसल्याच प्रकारची नोंद घेण्यात आलेले नाही. आतापर्यंत ग्रामरोजगार सेवक नैराश्येत व संकटात सापडलेला आहे. राज्यात महात्मा गांधी मनरेगा माध्यमाच्या २६४ योजना राबविण्यात आल्या. वेळेवळ मानधन मिळत असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने याचा योग्य विचार करून ग्रामरोजगार सेवकांचे आकृतीबंध समायोजन करून शासकीय सेवेत समाविष्ट करावे, किमान वेतन देण्यात यावे, वैयक्तिक खात्यात मानधन जमा करण्यात यावे तसेच ग्रामरोजगार सेवकाला विमा संरक्षण प्रदान करण्यात यावे, ग्रामरोजगार सेवकांचे प्रलंबित मानधन अदा करत यावे या मागणीसाठी आज पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

 

Protected Content