जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील आसोदा, ममुराबाद येथील निवास प्रयोजनासाठी ५०० चौरसफूट जागा मोजून द्यावी, या मागणीसाठी जी.एस.मैदानासमोरील पंचायत समिती कार्यालयासमोर जळगाव तालुका भाजपाच्या वतीने आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली असून विविध मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने सर्वांसाठी घरे २०२२ या धोरणा अंतर्गत जळगाव तालुक्यातील तालुक्यातील आसोदा, ममुराबाद येथील निवास प्रयोजनासाठी जागा मोजून द्यावी या मागणीसाठी आतापर्यंत ३२ वेळा निवेदने व ३० वेळा आंदोलन केले आहे. निवासी प्रायोजनासाठी आपल्या वारंवार मागणी केली असता पंचायत समितीच्या वतीने फक्त लेखी आश्वासने देवून पळवाट काढीत आहे. गेलया २०१८ पासून ते आतापर्यंत वारंवार मागणी करूनसुध्दा शासनस्थरावर कोणतीही कारवाई न करता अन्याय करीत आहे. याबाबत आसोदा व ममुराबाद ग्रामपंचायतीने पंचायत समिती कार्यालयात सर्व कागदपत्रे दिले आहे. जोपर्यंत प्रत्यक्ष जागा वाटपाचा कार्यक्रमाला सुरूवात होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुटणार नाही असा पवित्रा भारतीय जनता पार्टी झोपडपट्टी पुनर्वसन सेलचे जळगाव तालुकाध्यक्ष विनोद दामू अढाळके यांच्यासह पदाधिकारी यांनी घेतला आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/991858058190841