देऊलवाडे गावातील नदीपात्रात तीन गावठी दारूच्या हातभट्टीवर पोलीसांचा छापा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील देऊलवाडे गावातील तापी नदीपात्रात बेकायदेशीर गावठी दारूच्या तीन हातभट्टीवर तालुका पोलीसांनी आज सकाळी ६.३० ते ७.३० वाजेच्या सुमारास छापा टाकला तसेच  टाकून सुमारे १ लाख रूपये किंमतीचे दारू बनविण्याचे साहित्य व रसायन नष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तालुका पोलीस कर्मचारी तापी नदी पात्रात उतरूण रसायनाने भरलेल्या टाक्या बाहेर काढून नष्ट केल्या आहेत. याप्रकरणी तीन जणांविरूध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

तालुका पोलीस हद्दीतील देऊलवाडे गावातील तापी नदीपात्रात तीन ठिकाणी बेकायदेशीर गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांना मिळाली त्यानुसार तालुका पोलीस कर्मचारी यांनी आज शुक्रवार ७ मे रोजी सकाळी ७.३० वाजता पहिला छापा टाकला.

 

भागात सकाळी ६.३० वाजता केलेल्या कारवाईत सुरू असलेली दारूची भट्टी उध्दवस्त केली. दारू भट्टीधारक  प्रकाश शामराव बाविस्कर र. कांचननगर जळगाव हा पोलीसांनी पाहून घटनास्थळाहून पसार झाला. यावेळी तालुका पोलीसांनी २ हजार रूपये किंमतीचे दारू बनविण्याचे उकळते रसायन नष्ट केले, २६ हजार रूपये किंमतीचे कच्चे रसायन आणि ९०० रूपये किंमतीची तयार दारू असा एकुण २८ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला आहे. पो.कॉ. ज्ञानेश्वर कोळी यांच्या फिर्यादीवरून तालुकापोलीस ठाण्यात प्रकाश बाविस्कर याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दुसऱ्या कारवाईत केलेल्या ७ वाजेच्या छाप्यात तालुका पोलीसांनी गावठी हातभट्टीची दारू बनविणारा अनिल एकनाथ सोनवणे रा. देऊलवाडे ता.जि.जळगाव हा जागेवर वस्तू सोडून फरार झाला आहे. या कारवाईत तालुका पोलीसांनी २६ हजार रूपये किंमतीचे दारू बनविण्याचे कच्चे रसायन, २ हजार रूपये किंमतीचे पक्के रसायन आणि ९०० रूपये किंमतीचे तयार दारू असा एकुण २८ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला आहे. याप्रकरणी पो.कॉ. दिपक राव यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अनिल सोनवणे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी केलेल्या तिसऱ्या कारवाईत संशयित आरोपी प्रदीप देवचंद सोनवणे रा. देऊलवाडे ता.जि.जळगाव हा पोलीसांना पाहून फरार झाला होता. पोलीसांनी केलेल्या कारवाईत २८ हजार रूपये किंमतीचे नवसार मिश्रीत कच्चे रसायन, २ हजार रूपये किंमतीचे उकळते रसायन आणि ९०० रूपये किंमतीची तयार दारू असा एकुण ३० हजार ९०० रूपयांचा मुद्देमात नष्ट केला. पो.कॉ. दिपक कोळी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रदीप सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

यांनी केली कारवाई

पोहेकॉ साहेबराव पाटील, संजय चौधरी, बापु पाटील, राजेश पाटील, विलास शिंदे, विजय दुसाने, अनिल मोरे, मनोज पाटील, महेंद्र सोनवणे, भुषण सपकाळे, ज्ञानेश्वर कोळी, दिपक कोळी, दिपक राव यांनी ही कारवाई केली.

Protected Content