भरडधान्य खरेदी करतांना शेतकऱ्यांचे बारदान परत मिळणार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा केल्याने अखेर शेतकरी बांधवांकडून भरडधान्य खरेदी करताना सन २०१९- २० मध्ये आणी २०२१ मध्ये शेतकरी बांधवांनी स्वतःचे बारदान भरड धान्य केंद्रावर दिलेली होते ते परत करण्यात येतील व आपण शासनाकडून बारदान परतसाठी मागणी करू असे सांगण्यात आले होते त्या मागणीला यश आले असुन शेतकरी बांधवांना त्यांचे बारदान परत मिळणार असहे

भरड धान्य खरेदी केंद्र यावल उपभिकर्ता राकेश वसंत फेगडे यांनी सातत्याने शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे भरडधान्य उत्पादक शेतकरी बांधवांचे प्रश्न सुटणार आहे. शेतकरी वर्गात शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असुन आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

सन २०१९ आणि २०२० तसेच आणि २०२१ मध्ये शासनाकडून बारदान खरेदी विक्री साठी उपलब्ध नव्हते कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे सर्व जूट मिल्स बंद असल्याने बारदान पुरवठा शासनाकडून होत नव्हता मात्र शेतकऱ्यांनी व कोरपावली विकास सोसायटी उप अभिकर्ता खरेदी विक्री करताना त्यांनी शेतकऱ्यांना बारदान स्वतः आणावी असे आवाहन केलेली होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी प्रतिसाद देऊन बारदान स्वतः आणून भरडधान्य भरण्यासाठी केंद्रावर कुठलीही अडचण आलेली नव्हती, त्यामुळे शेतकऱ्यांचाही प्रश्न सुटला होता आणि शासनाची ही खरेदी झालेली होती.

सन २०१९ ते२०२१ या कालावधीत मध्ये शेतकऱ्यांनी जे बारदान शासकीय भरड धान्य केंद्रावर खरेदी विक्रीसाठी शेतकऱ्यांनी जो बारदान पुरवठा केलेला होता तो परत मिळावा, अशी शेतकरी वर्गाने मागणी केलेली होती. त्यानुसार शासनाने ज्या शेतकऱ्यांनी या कालावधीत भरड धान्य खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रावर जे बारदान पुरवलेले होते. ती परत मिळावे यासाठी शासनाकडे त्याचा पाठपुरावा केलेला होता. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना बारदान परत करण्यासाठी जो आदेश काढला. त्याबद्दल शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करत कोरपावली विकासोचे चेअरमन राकेश फेगडे व त्यांचे सर्व संचालक सहकारी उपअभिकर्ता कोरपावली तालुका यावल यांचे पंचक्रोशीतील व तालुक्यातील भरडधान्य उत्पादक शेतकरी वर्गातून आभार व्यक्त करण्यात येत आहे.

भरड धान्य खरेदी केंद्र यावल उप अभिकर्ता कोरपावली यांच्याशी संपर्क साधला असता हे बारदान ३१ जुलै २o२३ पासून ते १४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत सोमवार ते शनिवार दुपारी दोन ते संध्याकाळी पाच या वेळेत संपर्क साधून बारदान प्रत्येक शेतकऱ्याने परत घेऊन जावे असे सांगण्यात आले.

Protected Content