भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सर्व समाजातील लोक जाती-पाती धर्म हे सर्व धर्माच्या नावाने जातीच्या नावाने संघटित होताना दिसत आहे. परंतु महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आता शेतकऱ्यांनी जात धर्म पंथ सोडून फक्त शेतकरी म्हणून संघटित होणे गरजेचे आहे आणि आपला शेतकरी सध्या झोपी गेलेला आहे त्याला उठवणं गावागावात जाऊन शाखा स्थापन करणे हे खूप मोठे कार्य करणे आवश्यक आहे त्याशिवाय शेतकरी टिकणार नाही,वाचणार नाही म्हणून सांगतो शेतकऱ्यांनो उठा जागे व्हा आणि संघटित व्हावे व गावा गावात शाखा स्थापन करा असे प्रतिपादन महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांनी केले.
ते धोत्रे तालुका भडगाव येथे शाखा स्थापनेच्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाला महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे जिल्हा सचिव आनंदराव पाटील,भडगाव तालुकाध्यक्ष अभिमन हाटकर,धरणगाव तालुका अध्यक्ष संजय चव्हाण,भडगाव तालुका कार्याध्यक्ष देविदास पाटील, तालुका उपाध्यक्ष शांताराम आचारी, तालुका महासचिव जगन्नाथ मोरे, तालुका खजिनदार मनोज परदेशी,सदस्य अशोक पाटील, कंकराज शाखेचे शाखाप्रमुख हर्षल पाटील, पारोळा तालुका युवती आघाडी अध्यक्ष कुसुम बाविस्कर, संपर्कप्रमुख रक्षा बिर्हाडे, कोळपिंपरी महिला अध्यक्ष रत्ना पाटील, कंकराज युवती शाखाप्रमुख आशा पाटील मुंदाने युवती शाखाप्रमुख गीतांजली गोपीचंद पाटील,हंसराज पाटील, आण्णा पोपट पाटील,प्रमुख उपस्थिती होती. भडगाव तालुकाध्यक्ष अभिमान हाटकर यांनी आपल्या मनोगतात परिशिष्ट नऊ तसेच नारपार नदी जोड,पाटबंधारे या विषयावरती मनोगत व्यक्त केले.
तर युवती आघाडी अध्यक्षा कुसुम बाविस्कर,रत्ना पाटील, आशा पाटील, रक्षा बिर्हाडे, गितांजली पाटील यांनी युवतींनी,महिलांनी संघटनेत का यावे ? आणि संघटनेत काय फायदे होतात? तसेच संघटनेचे संकल्प काय आहेत याची माहिती दिली. यावेळी पंचक्रोशीतील आंचळगाव,महिंदळे येथील व गावातील शेतकरी महिला युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले तर आभार शिवदास हटकर यांनी मानले.
शेतकरी संघटनेची कार्यकारीणी जाहीर
महाराष्ट्र शेतकरी संघटनेची शाखा पदाधिकारी शाखा अध्यक्ष म्हणून दगा मल्हारी कोळी, कार्याध्यक्ष म्हणून शिवदास संतोष हाटकर, माहिती प्रमुख म्हणून उमेश कैलास धनगर, उपाध्यक्ष म्हणून भाऊसाहेब माणिक पाटील, संपर्कप्रमुख म्हणून धीरज संभाजी पाटील, खजिनदार म्हणून नागेश्वर बाळू कोळी, सचिव म्हणून संदीप कैलास कोळी, उपसचिव म्हणून दुर्योधन संजय कोळी, प्रसार माध्यम प्रमुख म्हणून गणेश संजय हाटकर, सल्लागार म्हणून बापू माणिक पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून सिताराम सुखदेव हाटकर, आरोग्य प्रमुख म्हणून विकास हिंमत हाटकर, युवा अध्यक्ष म्हणून भालेराव रमेश हाटकर,युवा उपाध्यक्ष म्हणून सुधाकर नाना हाटकर, सदस्य म्हणून बारकू शंकर हाटकर, आत्माराम भिका हाटकर, दत्तू हिम्मत हाटकर, मनोज सुभाष पाटील, भूषण भास्कर पाटील, निलेश विठ्ठल धनगर,राकेश शिवाजी पाटील, संभाजी राजु धनगर,रमेश रामभाऊ धनगर, मधुकर नामदेव धनगर, संतोष नामदेव धनगर, अनिल मच्छिंद्र हाटकर, रतन धुडकू हाटकर, विष्णू अर्जुन कोळी, भास्कर प्रल्हाद पाटील, मंगलबाई माणिक पाटील सुरेखा अशोक पाटील, छाया आबा पाटील, वंदना रवींद्र धनगर, सुरेखा कैलास कोळी, छायाबाई गोकुळ पाटील यांची नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.