वृध्दाच्या पिशवीतून ४५ हजाराची रोकड लांबविली

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सेवानिवृत्त व्यक्तीच्या पिशवीतून अज्ञात व्यक्तीने ४५ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नामदेव शंकर पाटील (वय-७५) रा. शिवाजी नगर, भडगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे, सध्या ते मुलांसोबत नाशिक येथे राहतात. बुधवार १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता ते भडगाव शहरातील स्टेट बँकेच्या शाखेत आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या बँक खात्यातून ४५ हजार रुपयांची रोकड काढली. दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेतून ४५ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचे समोर आले. हा प्रकार सेवानिवृत्त कर्मचारी नामदेव पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय काळे करीत आहे.

Protected Content