मका चोरून नेणाऱ्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहीगाव येथून व्यापाऱ्याच्या मालकीच्या मक्याच्या १५ गोण्या चोरून नेल्याप्रकरणी तीन जणांवर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील दहिगाव येथे फारुख बिस्मिल्ला पिंजारी (वय-२८) हे आपल्या कुटुंबियांचा वास्तव्याला आहे. धान्याचा व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. १३ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर दरम्यान गावातील मुस्लिम कमिटी दर्गामधून मकाने भरलेल्या १५ गोण्या कट्टे असा एकूण १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल गावातील रहिवासी नाना शिवदास साळुंखे, अजय नाना साळुंखे आणि विजय नाना साळुंखे यांनी चोरून नेत असताना सुरक्षारक्षक इमाम युनुस पिंजारी यांनी पाहिले. यावरून व्यापारी फारुख पिंजारी यांच्या फिर्यादीवरून तिन्ही संशयित आरोपींविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.

Protected Content