ब्रेकींग : कोर्टाच्या आवारातच आत्मदहनाचा प्रयत्न

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भूसंपादनाचे पैसे मिळत नसल्याने एका व्यक्तीने भुसावळ न्यायालयात आत्मदहनाचा केला प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेने फसला आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, बोदवड तालुक्यातील धोंडखेडा येथील शेतकरी दयाराम गोविंदा सोनसकर यांचे गेल्या अडीच वर्षापासून भूसंपादनाचे पैसे मिळत नसल्याने दयाराम सुनस्कर यांनी भुसावळ न्यायालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला . मात्र वेळीच शहर पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

दयाराम सुनस्कर यांनी भुसावळ न्यायाधीश यांना लेखी पत्राद्वारे कळविले होते की मला भूसंपादनाचे पैसे मिळत नसल्यामुळे मी भुसावळ न्यायालयाच्या आवारात १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आत्मदहन करणार आहे.

याला सरकार जबाबदार राहील असे पत्रात म्हटले होते त्या अनुषंगाने न्यायाधीशांनी सदरील बाब भुसावळ शहर पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन दयाराम सोनस्कर यांना ताब्यात घेऊन त्यांच्या वर कायदेशीर कारवाई केल्यानंतर त्यांना पुन्हा कोर्टामध्ये हजर करणार आहे.

Protected Content