मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत केळी उत्पादकांच्या सन २०२४-२५ अंतर्गत कमी व जास्त तापमानाच्या निकषात पात्र महसूल मंडळ बाबत माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे
डॉ. विवेक सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१ नोव्हेंबर २०२३ ते २८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान सलग ३ दिवस ८ अंश सेल्सीयस पेक्षा कमी तापमानामुळे रू.२६,५००/- प्रति हेक्टर नुकसान भरपाईस तालुकानिहाय पात्र ३६ महसूल मंडख पात्र ठरले असून यात खालील मंडळांचा समावेश आहे.
१. अमळनेर : अमळनेर, अमळगाव, मारवड, नगाव, पातोंडा.
२. भडगाव : कजगाव, कोळगाव
३. चाळीसगाव : बहाळ, शिरसगाव
४. धरणगाव : चांदसर, साळवा, सोनवद
५. एरंडोल : उत्राण
६. जळगाव : भोकर, म्हसावद
७. पारोळा : बहादरपूर, शेळावे
८. बोदवड : बोदवड, करंजी
९. चोपडा : चोपडा, धानोरा प्र., गोरगावले, हातेड बु.
१०. जामनेर : फत्तेपूर, जामनेर, नेरी बू.
११. मुक्ताईनगर : अंतूर्ली घोडसगाव, मुक्ताईनगर
१२. रावेर : खानापूर, खिर्डी बु., निभोरा बु., रावेर, सावदा
१३. यावल : बामनोद, फैजपूर
यासोबत, दि.१ एप्रिल २०२४ ते ३० एप्रिल २०२४ दरम्यान सलग ५ दिवस ४२अंश सेल्सीयसपेक्षा जास्त तापमानामुळे रू.३६,०००/- प्रति हेक्टर नुकसान भरपाईस तालुकानिहाय पात्र ७५ महसूल मंडळ असून ते खालीलप्रमाणे आहेत.
१. अमळनेर : अमळनेर, अमळगाव, भरवस, मारवड, नगाव, पातोंडा, शिरूड, वावडे.
२. भडगाव : भडगाव, कजगाव, कोळगाव.
३. चाळीसगाव : बहाळ, चाळीसगाव, हातले खडकी बू., मेहुनबारे, शिरसगाव, तळेगाव.
४. धरणगाव : धरणगाव, चांदसर, पाळधी, पिंप्री, साळवा, सोनवद.
५. एरंडोल : एरंडोल, कासोदा, रिंगणगाव, उत्राण गृह.
६. जळगाव : असोदा, नशिराबाद, जळगाव शहर,भोकर, म्हसावद, पिंप्राळा.
७. पाचोरा : गाळण बु., कुर्हाड बु., नगरदेवळा, नांद्रा, पाचोरा, पिंपळगाव बु., वरखेडी बु.
८. पारोळा : बहादरपूर, चोरवड, पारोळा, शेळावे,तामसवाडी.
९. भुसावळ : भुसावळ, कुर्हे, वरणगाव, पिंपळगाव खु.
१०. बोदवड : बोदवड, नाडगाव.
११. चोपडा : चोपडा, अडावद, चहार्डी, गोरगावले, हातेड बु., लासुर.
१२. जामनेर : जामनेर, पहूर, नेरी बु., शेंदुर्णी, वाकडी.
१३. मुक्ताईनगर : अंतुर्ली, घोडसगाव, कुर्हे, मुक्ताईनगर.
१४. रावेर : ऐनपुर, खानापूर,खिर्डी बु., खिरोदा, निंभोरा बु., सावदा.
१५. यावल : बामणोद, किनगाव बुद्रुक
वरील प्रमाणे पात्र महसूल मंडळातील विमाधारक शेतकरी नुकसान भरपाईच्या निकषात पात्र झाले असल्याबाबतची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.