अधिवेशन संपेपर्यंत सर्व अवैध धंदे बंद ! : मुक्ताईनगरातील ‘नंबर दोन’वाल्यांचा फंडा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहरासह तालुक्यातील अवैध धंद्यांचा विधीमंडळ अधिवेशनाच बोभाटा होत असल्याने अधिवेशन संपेपर्यंत सर्व ‘नंबर दोन’चे धंदे बंद करण्याचा निर्णय तालुक्यातील अवैध धंद्यावाल्यांनी घेतल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

मुक्ताईनगरातील अवैध धंद्यांचा मुद्दा हा गेल्या अनेक वर्षांपासून विधीमंडळात गाजत असतो. मात्र याचे पुढे काहीही होत नाही. अर्थात, यामुळे काही काळ तरी जनतेचे याकडे लक्ष जात असते. असेच सध्याच्या अधिवेशनातही घडले आहे. आमदार एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगरातील गल्लीबोळात भोवरे आणि चकर्‍या सुरू असल्याचा आरोप केला. तर गृहमंत्रक्ष फडणवीस यांनी ठोस पुरावे देण्याचे प्रति-आव्हान दिले.

दरम्यान, मुक्ताईनगर सह परिसरातील चकर्‍या भिंगर्‍या, हाय प्रोफाईल जुगार अड्डे यांना नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत बंद ठेवण्याच्या अवैध धंद्यावाल्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे.

चर्चांना दुजोरा म्हणून मागील अधिवेशनात याच धंद्यान संदर्भात नाथाभाऊंनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यानंतर तालुक्यातील अवैध धंदे तात्काळ बंद झाले होते परंतु अधिवेशन संपताच दुसर्‍या दिवशी पुन्हा याला उधाण आले होते. त्यामुळे आता सुद्धा हिवाळी अधिवेशन संपताच अवैध धंदे पुन्हा सुरू होणार याची खात्री परिसरातील नागरिकांना मागील अनुभवावरून आली आहे. परंतु हा अवैध धंदेवाल्यांना सूचना करून पाठीशी घालणारा मास्टरमाईंड कोण याबाबत नागरिकांमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहत. कारण शहरात भर चर्चेत असलेल्या खत्री गल्लीत आता काही दिवसांपर्यंत सन्नाटा पसरल्याने लोकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे. तर, अधिवेशन संपताच पुन्हा एकदा नंबर दोनवाल्याची बल्ले-बल्ले सुरू होईल असेही अनेकांना वाटत आहे.

Protected Content