अमळनेर तालुक्यात शेतकरी सल्लागार समिती गठीत

अमळनेर प्रतिनिधी । कृषि, तंत्रज्ञान, व्यवस्थापण यंत्रणा आत्मा अंतर्गत अमळनेर तालुक्याच्या शेतकरी सल्लागार समिती गठीत करण्यात आली असून अशासकीय सदस्यांची निवड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने तसेच आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. 

शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजना पोहचवणे तसेच अडीअडचणी सोडवण्यावर समिती भर देणार आहे.

समितीच्या अध्यक्षपदी सुनील भालेराव पवार (गलवाडे) यांची सर्वानुमते निवड झाली. तर सदस्यपदी तालुक्यातील शंकर बैसाणे (देवळी), सुलोचना वाघ (अमळनेर), शीतल पाटील (कुर्हे बु.), भय्यासाहेब पाटिल (रढावन), सुभाष आगळे (निम), कल्पना पाटील (निंभोरा), रेखाबाई पाटील (ढेकू खु.), उमाकांत साळुंखे (मारवड), निवृत्ती बागुल(गडखांब), शैला पाटील (मुडी प्र. डांगरी), मंगलबाई पाटील (टाकरखेडा), कल्पना पवार (पातोंडा), अस्लेशा साळुंखे (गांधली),भटू पाटील (मंगरूळ), हेमंत महाजन (अमळनेर), विजयकुमार जैन (मुडी), प्रशांत भदाणे (दहिवद), शिवाजीराव पाटील (अंतुर्ली), शामकांत पाटील (जवखेडा), प्रविण पाटील (गंगापूरी), विनोद जाधव (नगाव बु.), रविंद्र पाटील (जानवे), सुरेश पाटील (निंभोरा), यासोबतच तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील ( कळमसरे-जळोद गट), मिनाबाई पाटील (दहिवद-पातोंडा गट), सोनु पवार (जानवे-मंगरूळ गट), संगिता भिल्ल (मुडी-मांडळ गट) तसेच पंचायत समितीच्या सभापती त्रिवेणीबाई शिवाजी पाटील (शिरूड गण) यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तालुक्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विधानसभा क्षेत्रप्रमुख, ग्रामीण व शहर कार्याध्यक्ष सह सर्व सेलचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी निवड झालेल्या पदाधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.

 

Protected Content