रावेर येथे रामस्वामी महाराजांची पुण्यतिथी साजरी

raver 1

 

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील प्रसिद्ध रामस्वामी महाराजांची पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली.

सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, रामस्वामी मठात जयंत कुलकर्णी, प्रतिभा कुलकर्णी यांचे हस्ते सपत्नीक महाराजांच्या समाधीवर अभिषेक, पूजन, आरती करण्यात आली असून पुजारी प्रकाश जोशी, संजय मटकरी यांनी मंत्रोच्चार केले. यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी ब्रह्मवृंद समाजाचे अध्यक्ष प्रकाश मुजुमदार, उपाध्यक्ष अरविंद पाठक, सचिव भानुदास कुलकर्णी, सुधाकर वैद्य, अ.वि.रावेरकर, विलास कुलकर्णी, भानुदास कुलकर्णी, सुनील कुलकर्णी, संजय लिमये, सुमंता कुलकर्णी, यदुदत्त दुबे, ऋषिकेश कुलकर्णी, कपिल दुबे, प्रभुदत्त मिसर, गणेश दुबे, श्याम दुबे, आशिष कुलकर्णी, मुकेश दुबे, ब्रह्मवादिनी मंडळाच्या अध्यक्ष मंगला मुजुमदार, उपाध्यक्ष विना कुलकर्णी, सचिव सुवर्णा भागवत व समस्त ब्रम्हवृंद समाजाचे पदाधिकारी, महिला मंडळाच्या भगिनी या कार्यक्रमास उपस्थित होत्या.

Protected Content