जळगाव प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथील ४८ वर्षीय शेतकरी शेतात फवारणीचे काम करत असतांना सर्पदंश झाल्याने त्यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, विनोद फकिरा चौधरी (वय-४८) रा. पहूर हे शेतकरी करून शेतात काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. आज १८ जुलै रोजी ते शेतात पिकांना औषध फवारणी करत असतांना त्यांनी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सापाने चावा घेतला. ही बाब त्यांचे भाऊ योगेश चौधरी यांच्या लक्षात आल्याने त्यांना खासगी वाहनाने तातडीने पहूर रूग्णालयात आणले. तिथे प्राथमोपचार करून त्यांना तातडील जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. उपचार करण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
मेहुणे मयत झाल्याचे पाहून शालक विजय पाटील यांनी जिल्हा रूग्णालयाच्या आवारात हंबरडा फोडला होता. मयत विनोद चौधरी यांच्या पश्चात पत्नी कल्पना, आई सुशिला, वडील फकिरा नथ्थू चौधरी, कुणाल व पवन दोन मुले आणि गौरी व अक्षदा ह्या दोन मुली आणि एकभाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.