बस प्रवासी सुरक्षित वाहतूकीबाबत कार्यशाळा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव जिल्ह्यातील खासगी बस आणि एस.टी. बस प्रवासी सुरक्षित वाहतूकीबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रादेशिक परिवहन आधिकारी श्याम लोही यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

जळगाव जिल्ह्यातील खासगी बस आणि एस.टी. बस प्रवासी सुरक्षित वाहतूकीबाबत बस मालक, चालक, वाहक आणि एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांची  यांची रस्ता सुरक्षा सभागृह प्रादेशिक परिवहन कार्यालयात बुधवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेचा १५० प्रतिनिधी यांनी लाभ घेतला. सदर कार्यशाळेसाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, एसटीचे विभाग प्रमुख भगवान जगनोर, ट्राफिक पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे हे उपस्थित होते. सदर कार्यशाळेमध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रादेशिक परिवहन आधिकारी श्याम लोही आणि नितीन सावंत यांनी मार्गदर्शन केले.

Protected Content