भरारी फाऊंडेशनच्या सेंटरमधून 5 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले

जळगाव, प्रतिनिधी । भरारी फाऊंडेशनच्या कोविड केअर सेंटरमधून 5 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत . या वेळी डॉ स्वप्नील पाटील, डॉ केतन पाटील, डॉ लक्षमनसिंग राजपूत, भरारी फाउंडेशनचे सचिन महाजन, आकाश धनगर, दीपक परदेशी, मोहित पाटील, देवराज बोरसे, बाळू परदेशी उपस्थित होते

भरारी फाऊंडेशन या बहुउद्देशीय संस्थेने छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुल येथे 50 खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी रुग्णांची घरासारखी पण पूर्णतः वैद्यकीय सल्ल्यानुसार काळजी घेणे सुरू आहे. आरोग्यसोबतच रुग्णांच्या मनालाही उभारी मिळावी यासाठी अनेक मोटिवेशनल स्पीकर्स तसेच मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर या सेंटरला भेट देऊन जात असतात. नाट्य समीक्षक व सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील, मोटिवेशनल स्पीकर रामचंद्र पाटील, जयदीप पाटील, गिरीष कुलकर्णी यांनी भेट देऊन रुग्णांचे स्वतंत्र सेशन घेतले. निसर्गोपचार तज्ञ अनंत महाजन हे रोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत रुग्णांचा अर्धा तास योग वर्ग घेऊन त्यांची प्रतिकारक्षमता वाढवीत आहेत. रोज विविध विषयांवरचे वक्ते व भरारी फाउंडेशनचे पालक रजनिकांतकाका कोठारी, केशवस्मुर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, जैन उदयोग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, अनिष शहा, नंदू आडवाणी, अनिल भोकरे , डॉ.राजेश पाटील, सपन झुनझुनवाला, सुशील नवाल, सुनील झंवर, आदेश ललवाणी, अनिल कांकरिया, मनपा सभापती सुचिताताई हाडा,रवींद्र लढा, नरेश खंडेलवाल, अमर कुकरेजा, डॉ.राधेश्याम चौधरी व अजिंक्य देसाई हे मान्यवर मार्गदर्शन व सहकार्य करीत आहेत. भरारी फाउंडेशनचे कार्यकर्ते यासाठी परिश्रम घेत आहेत.

Protected Content