जामनेरात राज्याचे धर्मदाय आयुक्त महेंद्र महाजन यांचा सत्कार

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेरचे सुपुत्र महेंद्र केशव महाजन यांची गेल्या चार महिन्यापूर्वी राज्याचे धर्मादाय आयुक्तपदी नियुक्ती झाली असून याबाबत ज्येष्ठ सेवा संघातर्फे त्यांच्या नागरिक सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आपले जीवन उजाळा दिला.

यावेळी सत्काराला उत्तर देतांना महेंद्र महाजन म्हणाले की, आज आपण सर्वजण आपल्या मुलांना हालाखीची परिस्थिती असतानाही शिकवतो मोठे करतो आणि ती सुशिक्षित होऊन नोकरीला लागतात व परदेशात जातात. मात्र ते आई-वडिलांना सांभाळत नाही त्यामुळे आपण थोडीशी संपत्ती आपल्या वृद्धकाळासाठी सांभाळावी असे सांगितले.

तसेच सिव्हील इंजिनीअर होण्याची इच्छा होती, पण टेक्नीकल विषय नसल्याने होऊ शकलो नाही, वडीलांची गादी सांभाळावी व वकील व्हावे ही त्यांची इच्छा होती, मुख्याध्यापक स्व. एल ई पाटील यांच्या आदेशाने विज्ञान सोडून वाणिज्य शाखेत गेलो व वकीलीसाठी शिक्षणाला सुरुवात केली. जामनेर न्यायालयात वकील, सरकारी वकीलनंतर न्यायाधीश झालो. चार महिन्यापुर्वी धर्मदाय आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारला, असे प्रतिपादन राज्याचे धर्मदाय आयुक्त महेंद्र महाजन यांनी केले.

नोव्हेंबरपासुन समाजसेवी संस्थानांना मदत देण्याची योजना आहे. आदिवासी भागात पालघर जिल्ह्यात धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडुन मदत दिली. डायलीसीस मशीन दिले.
गरीबीतुन शिकलो, कष्ट केले, परदेशात स्थाईक झालेल्या मुलांची इच्छा असते. आम्हाला वृध्दाश्रमात राहणाऱ्या आई, वडीलांशी बोलु द्या. जेष्ठ नागरीकांनी स्वत:साठी काहीतरी ठेवावे, या अमिषापोटी तरी मुले तुमचा सांभाळ करतील, असेही महाजन यांनी सांगितले.

याप्रसंगी डॉ. एस. डी. महाजन, जैन ओसवाल संघाचे सचिव पुखराज डांगी, डॉ. नंदलाल पाटील, प्रकाश महाजन, डी.बी. पाटील आदींनी त्यांचा सत्कार केला. प्राचार्य अरविंद चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. जगन्नाथ चिंचकर यांनी संचलन केले. रसालसींग पवार, आर.एस. पाटील यांचेसह जेष्ठ नागरीक उपस्थित होते.

Protected Content