रामपेठ परिसरातून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील रामपेठ भागात असलेल्या एका तरुणाची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत शनिवार २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शनिपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव नारायण जोशी (वय-३३, रा. रामपेठ, भट गल्ली, जळगाव) हा तरुण आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे.  खाजगी काम करून आपला उदरनिर्वाह करतो.  २५ ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० ते सकाळी ४ वाजेच्या दरम्यान त्याच्या घरासमोर लावलेली त्याची दुचाकी (एमएच १९ बीटी ९६९५) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. प्रणव जोशी यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी त्याला कुठेही मिळून आली नाही. अखेर शनिवारी २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास सहाय्यक फौजदार रघुनाथ महाजन करीत आहे.

 

Protected Content