Home Cities यावल डोंगरकठोरा येथील शेतमजूराची विहीरीत उडी घेवून आत्महत्या

डोंगरकठोरा येथील शेतमजूराची विहीरीत उडी घेवून आत्महत्या

0
41

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगर कठोरा येथील एका शेतकऱ्यांने शेतातील विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील रहिवशी शेतकरी भरत जनार्दन जंगले (वय-४५) हा शेतमजूर असून शेतात काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. दरम्यान, २७ एप्रिल रोजी सायंकाळी ते घरातून निघाले. रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोधाशोध केली परंतू आढळून आले नाही. आज २८ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास डोंगर कठोरा शिवारातील विनोद मधुकर राणे यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आला. हा मृतदेह भरत जंगले यांच्याच असल्याचे उघड झाले. दरम्यान त्यांनी आत्महत्या करण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मयत भरत जंगले यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई असा परिवार आहे. शेतमालक विनोद रोणे यांच्या खबरीवरून यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

 


Protected Content

Play sound