मुक्ताईनगर तालुक्यातील सरपंचांची कोरोना उपाय योजना आढावा बैठक

मुक्ताईनगर प्रतिनिधी ।  तालुक्यातील सरपंचाची महत्वपूर्ण आढावा बैठक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयातील सभागृहात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली

या  बैठकीत ग्रामपंचायतींनी स्थानिक पातळीवर 15 व्या वित्त आयोगातून आरोग्यावर खर्च करण्याची तरतूद असल्याने कोरोना अँटीजन टेस्टिंग किट घेतले पाहिजे , प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये विशेषतः मोठ्या ग्रामपंचायतीने नॅचरल ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटअर मशीन खरेदी करून कोविड केअर सेंटर किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सोय उपलब्ध करुन दिल्यास उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन  द्यावा लागणाऱ्या  रुग्णांच्या प्रश्नांचा प्रचंड भार कमी होईल  वेळेआधीच रुग्णांची चाचणी करून बाधित असल्याचे समजताच त्याला क्वारंटाईन करण्यात येऊन योग्य उपचार केल्यास कोरोनाची साखळी तुटण्यात मदत होईल सरपंचांच्या माध्यमातून त्या त्या गावातील परिस्थितीचा आढावा घेऊन तक्रारींवर चर्चा करण्यात आली योग्य नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी महत्वपूर्ण बैठक पार पडली

या बैठकीमध्ये तहसीलदार श्वेता संचेती, गट विकास अधिकारी संतोष नागटिळक, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे, तालुका वैद्यकीय अधिकारी निलेश पाटील, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड, नगराध्यक्ष नजमा तडवी, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, नायब तहसीलदार पी.एम. पानपाटील, पंचायत समिती विस्तार अधिकारी आर एल जैन, छोटू भोई, प्रवीण चौधरी, प्रशांत पाटील आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content