यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । निरोपाच्या हळव्या क्षणी दाटून येती आठवणी, सहवास सुटला म्हणुन सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही असे म्हणत येथील जे. टी महाजन इंग्लिश स्कुलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा अत्यंत भावनिक असा निरोप समारंभ शाळेच्या आवारात गुरूजंनांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर कार्यक्रमचे प्रमुख पाहुणे जे. टी. महाजन सेमी इंग्लिश स्कूल येथील प्राचार्य नंदकिशोर सोनवणे उपस्थित होते, तसेच शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन, प्राचार्य किरण खेट्टे, आय.टी.आयचे प्राचार्य गिरीष वाघुळदे, प्रवीण झोपे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यानंतर दहावीतील विद्यार्थीनी व विध्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील बालपणाच्या जुन्या आठवणीला उजाळा देत आपले भावनिक संभाषण दिले यावेळी त्यांनी आपल्या गुरूजनांचे विशेष आभार मानले, कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित विद्यार्थांचे आपल्या गुरूजनांचा निरोप घेतांना आठवणीनी डोळे अश्रूंनी पाणावले तसेच शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन, प्राचार्य डॉ. किरण खट्टे यांनी विध्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष शरद जिवराम महाजन यांनी ही आपले मनोगत व्यक्त करतांना मुलांचे कौतुक करून त्याना भविष्यातील पुढीलवाटचाली साठी व दहावीच्या परीक्षासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात याप्रसंगी उपस्थित आय टी आयचे शिक्षक जितेंद्र चौधरी यांनी ही विद्यार्थी मुलांना शुभेच्छा दिल्या.तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे यांनी यावेळी मुलांबद्दल संभाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती गौरी भिरूड यांनी केले तर आभार श्रीमती लता इंगळे यांनी मानले. या नंतर विद्यार्थ्यांनी विविध खेळ खेळत व गाण्यावर नृत्य सादर करून आपला आनंद व्यक्त केला. यावेळी शाळेच्या शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व आय टी आय चे शिक्षक उपस्थित होते.