यावलमधील प्रतिबंधीत क्षेत्र सील; नियमांचे पालन करण्याचे आवाहन

यावल प्रतिनिधी । यावलमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढला असतांना शहरातील कंटेनमेंट झोन म्हणजेच प्रतिबंधक क्षेत्र जाहीर झाले असून यांना सील करण्यात आले आहे. तर नागरिकांनी आता तरी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

यावल शहरात नागरिकांच्या बेशिस्त वागणुकीमुळे मागली चार दिवसांमध्ये पाच रुग्ण हे कोरोना पॉझिटिव आले असून त्यातील एक भाजीपाला विक्रत्याचा जळगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, तो राहत असलेल्या तिरुपती नगर परिसराला सील करण्यात आले असून नगरपालिकेच्या वतीने संपूर्ण परिसरात संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली असून हा संपूर्ण परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे.

यावल शहरातील सुदर्शन चित्रमंदिर परिसर तसेच पूर्णवाद नगर हे क्षेत्र कालपासून कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून यानंतर बुधवारी मरण पावलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्क आलेल्या नगरपालिकेच्या आठ ते दहा कर्मचार्‍यांना व त्यांच्या कुटुंबांना खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ होम क्वारंटाईन करण्याचे आदेश यावल नगरपालिकेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी दिले आहेत. दरम्यान मागील चार दिवसांपासून कोरपावली २; दहिगाव १ व यावल ३ असे रूग्ण आढळून आले असून यापैकी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील फैजपूर शहरात दोन व डांभुर्णी येथे एक तीन महिन्याची बालिका ही संशयित म्हणून मृत्यू पावलेली असून या सर्व रुग्णांच्या कुटुंबातील सुमारे एकशे तीस लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत. यातील जवळपास ३४ लोकांचे नमुने तपासणी साठी पाठवण्यात आले असून पाठविण्यात आले असून एक ते दोन दिवसात हे अहवाल आरोग्य यंत्रणा कडे प्राप्त होतील असे आरोग्य सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळते.

दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून तहसीलदार जितेंद्र कुवर, यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ हेमंत बर्‍हाटे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन सज्ज झाले आहे. तर या प्रभागाचे नगरसेवक अतुल पाटील यांनी तिरुपती नगर येथे प्रतिबंध क्षेत्राला भेट देऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून नगरपालिकेच्या उपाययोजनांची पाहणी केली व व नागरिकांना आपल्या घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले.

Protected Content