झेड. पी. मधील वरिष्ठ अधिकार्‍याचा कोरोना अहवाल निगेटीव्ह

जळगाव प्रतिनिधी । कोरोना बाधीत म्हणून उपचार घेत असलेल्या जिल्हा परिषदेतील उच्चपदस्थ अधिकार्‍याची दुसरी चाचणी निगेटीव्ह आल्याचे वृत्त आहे.

पाचोरा येथील कोरोना पॉझिटीव्ह पोलीस अधिकार्‍याच्या संपर्कात आल्याने जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकार्‍याला या विषाणूची बाधा झाली होती. त्यांच्या रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. विशेष करून जिल्हा परिषदेत त्यांच्या संपर्कात आलेले तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांना यामुळे संक्रमणाचा धोका निर्माण झाला होता. यातील काही जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. दरम्यान, दहा दिवसांचा उपचार घेतल्यानंतर या अधिकार्‍यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. यानंतर नियमानुसार अजून एक स्वॅब सँपल निगेटीव्ह आले की, संबंधीत अधिकार्‍याला कोरोनामुक्त म्हणून जाहीर करण्यात येणार आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेतील हा उच्चपदस्थ अधिकारी आता कोरोना निगेटीव्ह झाल्याने प्रशासकीय यंत्रणांनी सुटकेचा श्‍वास सोडला आहे.

Protected Content