धरणगाव तालुक्यात आज दोन नवीन कोरोना बाधीत !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यात आज दोन नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यात शहरातील एक तर पाळधी खुर्द येथील एका रुग्णाचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.

 

धरणगाव तालुक्यात आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये दोन नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. त्यात शहरातील मराठे गल्लीतील एक तसेच पाळधी खुर्द येथील एका रुग्णाचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. संबंधीत रूग्णांच्या रहिवासाचा परिसर सील करण्यात येत असून परिसरात फवारणी करण्यात येणार आहे. दरम्यान, आजच्या दोन रूग्णांमुळे तालुक्यातील आजवर आढळून आलेल्या कोरोना बाधीतांची एकूण संख्या १४३ इतकी झाली आहे. यातील १३ जण मयत झालेत आहेत. तसेच आतापर्यंत ९१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजरोजी कोविड सेंटरला ३९ रुग्ण उपचार घेत आहेत.

Protected Content