साकेगावाच्या ग्रामस्थांची मागणी पूर्ण; अखेर मिळाली रूण्गवाहिका

साकेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । साकेगाव येथील स्मार्ट व्हिलेज ग्रामपंचायतीने अनेक मोठ्या घोषणा करत असते मोठा गाजावाजा करत असतात मात्र ज्या गोष्टीची गरज होती अशी प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारी रुग्णवहिनी नव्हती. तत्कालीन रेल्वे कर्मचारी शकील पटेल यांनी स्वखर्चातून अनिल पाटील सरपंच होत असतील तर मी त्यांना रुग्णवाहिका घेऊन देतो. त्यासाठी शकील पटेल व भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या माध्यमातून साकेगावात एक रुग्णवाहिका देण्यात आली होती. मात्र ही रुग्णवाहिका खराब झाल्यामुळे गावात एकही रुग्णवाहिका नव्हती गावाची गावाची लोकसंख्या तब्बल वीस ते पंचवीस हजारच्या आसपास आहे.

गावाला लागून एक राष्ट्रीय महामार्ग सहा जात असून राष्ट्रीय महामार्गावर अनेकदा घात अपघात होत असतात, तसेच साकेगावला शिक्षणाचे हब म्हणून सुद्धा म्हणून ओळखले जाते. गावात गोदावरी फाउंडेशन, चैतन्य महाविद्यालय तसेच यशोदाबाई सराफ चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोठे महाविद्यालय गावात सुरू आहे. यात बाहेर जाऊन येणारे विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग आहे. त्या अनुषंगाने गावात एक रुग्णवाहिका असणे महत्त्वाचे होते. या गावासाठी आम्हाला काहीतरी पाहिजे आहे असे दाखवत होते. मात्र त्यांनी अनेकदा गावासाठी लागणारी रुग्णवाहिका कागदावरच दाखवली होती. मात्र साकेगावचे प्रभारी सरपंच सागर सोनवाल व साकेगावच्या प्रभारी ग्रामविकास अधिकारी कांचन बादशहा यांच्या माध्यमातून आज अखेर साकेगावला रुग्णवहिका मिळाल्याचे ग्रामस्थांमधून समाधान होत आहे.

Protected Content