महाराणा प्रतापसिंहजी यांना विरावलीत वंदन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज  प्रतिनिधी | वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांना तालुक्यातील विरावली येथे तिथीनुसार जयंतीनिमित्त आयोजीत कार्यक्रमात वंदन करण्यात आले.

 

विरावली तालुका यावल येथील राजपूत समाज बांधवांच्या वतीने आयोजित वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कॅप्टन राजेंद्र राजपूत यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर मान्यवर फकीरा कान्हा पाटिल, कैलाश उखा पाटिल, डीगम्बर विट्ठल पाटिल, किशोर नरसिंग पाटिल कोळवद तालुका यावल व सैन्यदलातील अधिकारी महेन्द्र पुंडलिक पाटील आणि सौ.सोनाली राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला विरावली गावातील राजपूत समाज सह ग्राम वासी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंहजी यांची तिथीनुसार जयंती ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अखंड भारतात साजरी केली जाते. मोघलांचे मांडलिकत्व शेवटच्या श्वासापर्यंत झुगारणार्‍या, छोट्याशा मेवाड च्या बदल्यात अखंड हिंदुस्तान चा अर्धा भाग लाथाडणार्‍या, प्रसंगी डोंगरदर्‍यात राहून भिल्ल व आदिवासींचे  सहकार्य घेऊन अकबराला जेरीस आणणार्‍या व स्वाभिमान, आत्मप्रतिष्ठा, स्त्रीसन्मान जागृत करणारा धगधगता यज्ञकुंड म्हणजेच वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी. महाराणा यांचा जीवनकाळ २२ मे १५४० ते १९ मे १५९७ असा एकूण ५७ वर्षाचा असून त्यातील २५ वर्षा पेक्षा जास्त काळ संघर्षात गेला. यावेळी कुटुंबकलह ते हल्दीघाटी चा प्रवास व त्यानंतर मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत गनिमी काव्याच्या माध्यमातून अकबराला जेरीस आणनारे विविध प्रसंग शब्दरूपाने उपस्थिता समोर मांडले. यासोबतच घराघरात नव्हे तर मनामनात महाराणा प्रताप यांचे चरित्र वाचन, मनन व चिंतनाद्वारे पोहोचविण्याचे महतकार्य प्रत्येक राजपूत समाज बांधवांनी करावे असे आवाहन कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले.

 

याप्रसंगी विरावली गावातील समाज बांधवांनी भव्य शोभायात्रेतून महाराजांची जयंती साजरी केली. यासोबतच दिनांक २३ मे रोजी व्याख्यानाच्या माध्यमातून महाराजांचे जीवन चरित्र समजून घेतले. यासाठी परिसरातून विरावली ग्रामस्थ समाजबांधवांचे कौतुक व अभिनंदन केले जाते आहे.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भारतीय सैन्यदलातील महेंद्र पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी ग्रंथालय, व्यायामशाळा व विविध महापुरुषांच्या जीवनचरित्रांच्या व्याख्यानमालेतून तरुणांनी स्वतःचे करिअर घडवावं व सोबतच समाज व देशासाठी विधायक भरीव योगदान द्यावे अशी आशा व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ईश्वर धोंडूसिंग पाटिल ( मा. सरपंच), चंद्रकांत देवीदास पाटिल (पोलिस पाटील), माधव मोतीराम  पाटिल, सुनील (मेंबर) कडू पाटिल, सागर (जीतू) पाटिल, राज त्रम्बक पाटील, महेश चंद्रकांत पाटिल, रोहित अशोक पाटिल, नितिन संजय पाटिल, यांचे सह समस्त विरवली ग्रामस्थ बांधवांनी परिश्रम घेतले.

Protected Content