जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरवासीयांना दिवाळी व पाडवा निमित्त एक आगळे वेगळे मेजवानी म्हणून ना. गिरीश महाजन फाउंडेशन तर्फे शहरातील गोविंद महाराज संस्थांच्या जागेवर दिवाळी संध्या या स्वर गीताचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांमध्ये प्रमुख आकर्षण म्हणून मराठी सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी कार्यक्रमांमध्ये विविध मराठी गाण्याची मेजवानी दिली. यामेजवानीने रसिकांना मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाला”जल्लोष अवधुताचा” मैथिलीला राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरिषभाऊ महाजन, भा.ज.पा जिल्हाध्यक्ष आ. राजुमामा भोळे,आ. मंगेश चव्हाण, धुळे जिल्हा अधिकारी शर्मा पोलीस अधीक्षक धुळे पोलीस अधीक्षक जळगाव राजकुमार सावकारे, भा.ज.पा प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ, नगराध्यक्षा साधनाताई महाजन, भा.ज.पा जिल्हा उपाध्यक्ष नंदुभाऊ महाजन, अमोल जावळे, जितेंद्र पाटील, चंद्रकांत बाविस्कर, अमित देशमुख, नवल पाटील, मनोहर पाटील, सागर चौधरी, अॅड. शिवाजी सोनार, छगन दादा झाल्टे आदी यावेळी उपस्थित होते. त्याचबरोबर कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने शहरातील व जिल्हाभरातील नागरीक उपस्थित होते.