राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी हभप भटू महाराज यांची निवड

शेअर करा !

चोपडा प्रतिनिधी । राष्ट्रीय भागवतधर्म परिषदेच्या चोपडा तालुका अध्यक्षपदी तालुक्यातील अनवर्दे येथील हभप भटू महाराज यांची निवड करण्यात आली आहे.

store advt

राष्ट्रीय अध्यक्ष हभप एकनाथ महाराज महाराज सदगिर यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. तरी यांची सामाजिक संस्कृतिक व राजकीय क्षेत्रातून त्यांच्या या निवडीचे कौतुक होत आहे. खान्देश प्रांताध्यक्ष गुरुवर्य तुकाराम महाराज चिंचोलकर जळगाव जिल्हाध्यक्ष ह.भ.प राजेंद्र महाराज केकतनिंभोरा यांनी महाराजांचे कौतुक व अभिनंदन केले. आपल्या कार्यक्षेत्रात निष्ठावंत वारकऱ्यांच्या संघटित करून उत्तम कार्यकारणी तयार करून वारकऱ्यांचे प्रश्न सोडवू तसेच देव देश धर्माचे कार्य करणार असल्याची प्रतिक्रिया हभप भटू महाराज यांनी सांगितले.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!