विशाखापट्टणमध्ये क्रेन कोसळल्यामुळे १० मजुरांचा मृत्यू

विशाखापट्टणम (वृत्तसंस्था) आंध्र प्रदेशमधल्या विशाखापट्टणममधील हिंदुस्तान शिपयार्डमध्ये क्रेन कोसळल्यामुळे १० मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे.

 

हिंदुस्तान शिपयार्डमधील मोठी क्रेन कोसळल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. दुर्घटनेवेळी जवळपास १८ मजकूर क्रेनवर काम करत होते. क्रेनमधून लोडिंग सुरू असताना दुर्घटना घडली. क्रेन खाली दबलेल्या दोन मजुरांना बाहेर काढण्यात यश आले आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडूंनी ट्विट करून दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तर घटनास्थळी अधिकारी पोहचले आहेत.

Protected Content