यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील श्री मनुदेवी आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ व्दारे संचलीत सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश स्कूलच्या वार्षीक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.शाळेच्या परिसरात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक जामकर , (भूमीअभिलेख यावल) शाळेचे अध्यक्ष राजेंद्र महाजन तसेच शाळा सदस्य शशिकांत फेगडे व दिपक महाजन व सारिका वाणी (पोलीस नाईक) व पर्यवेक्षक म्हणून फैजपूर येथील नृत्यशिक्षिका शोभा लोधी व नितिन कोळी इत्यादि मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले. सर्वात प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले . त्यानंतर स्वागत गीत म्हणून प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले . कार्यक्रमात स्वागत गीतानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका शिला तायडे यांच्या हस्ते प्रमुख अतिथींचा आदर सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
इयत्ता प्री – प्रायमरीच्या चिमुकल्यांपासून इयत्ता चौथी पर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला विद्यार्थ्यांनी पारंपारिक तसेच विविध प्रकारच्या वेशभूषा केलेल्या होत्या. अनेक विद्यार्थ्यांनी वेशभूषेला अनुसरून भाषणे देखील केले काही विद्यार्थ्यांनी एकांकी नृत्य सादर करून कुशलतेने आपले कला कौशल्य सादर केले व प्रमुख अतिथींची तसेच सर्वच पालकांची व प्रेक्षकांची मने जिंकली सर्वच विद्यार्थी या स्पर्धेमुळे अत्यंत उत्साही तसेच आनंदीत दिसून येते होते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा साळुंखे व प्रवीणा पाचपांडे यांनी केले व आभार प्रदर्शन अर्चना महाजन यांनी केले. राजेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत फेगडे तसेच सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग यांचे कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष सहकार्य लाभले अशा प्रकारे फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
पटेल इंग्लिश स्कुलमध्ये स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने फॅन्सी ड्रेस स्पर्धा
9 months ago
No Comments