मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचा आज सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पीटलात निधन झाले आहे. ही माहिती त्यांची मुलगी नायब हिने दिली आहे. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. पण त्यांना कोणता आजार होते हे मात्र स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतातील मंडळीना मोठा धक्का बसला आहे.
८० च्या दशकात पंकज उधास यांनी आपल्या संगीत करियरला सुरूवात केली होती. चार दशक अधिक काळ ते बॉलीवूडमधील संगीत विश्वात लोकप्रिय होते. त्यांची मुलगी नायब हीने सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांना २००६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याव्यतिरिक्त त्यांना जगभरातील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. ‘जिये तो जियो कैसे या’, ‘चिठ्ठी आयी है’ या गीतांमुळे त्यांना प्रसिध्द मिळाली होती.