शरद पवार सोनिया गांधींना भेटणार ; राजकीय घडामोडींना वेग

 

pawar sonia

 

मुंबई (वृत्तसंस्था) भाजप-शिवसेनेत राज्यातला सत्ता स्थापनेचा पेच सुटत नाहीय. तर दुसरीकडे याच विषयावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पवार उद्या संध्याकाळी दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीला ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेणार आहेत.

युतीच्या सत्तास्थापनेत तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. आजच्या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, तटकरे आणि धनंजय मुंडे उपस्थित आहेत. शिवसेनेला अडीच वर्ष नव्हे तर पाच वर्ष मुख्यमंञी पदाची संधी आहे, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. काँग्रेसमध्ये मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून दोन गट असल्याचे चित्र आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी याआधीच शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सोनिया गांधी निर्णय घेतील, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीत दोन्ही पक्षांची भूमिका स्पष्ट होईल.

Protected Content