एणगावच्या सरपंचपदी अन्नपूर्णा कोळी यांची बिनविरोध निवड

बोदवड प्रतिनिधी | तालुक्यातीत एणगाव येथे निवडणूक निर्णय अधिकारी एम एस पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीत अन्नपूर्णा कोळी यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

मंगळवार, दि. ४ जानेवारी रोजी एणगाव येथे झालेल्या निवडणूकीत सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्य अन्नपूर्णा कोळी यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची दुपारी २ वाजता बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले. निवडणूकीसाठी ग्रा.प.क्लर्क कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी ग्रामसेवक श्री.सांगळे हे उपस्थित होते

नवनिर्वाचित सरपंच अन्नपूर्णा विनोद कोळी यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे भैय्या पाटील, पंचायत समितीचे सभापती किशोर गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तालुकाध्यक्ष विनोद कोळी यांनी नवनिर्वाचित सरपंच यांचे अभिनंदन केले आहे.

गावातील नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. ग्रामपंचायत सदस्य सुरेखा तळेले, सारिका बोंडे, नीतू खाचणे, शारदा पारधी, महेंद्र बोंडे, निवृत्ती बोंडे, महेश तळेले यासह नागरिकांची उपस्थिती होती.

Protected Content