रावेर येथील ढाब्यांवरील अवैध दारू विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!

रावेर, प्रतिनिधी | तालुक्यातील जेवणाच्या ढाब्यांवर सर्रासपणे अवैध दारू विक्री होत असल्याने दारू विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्कने केलेली कारवाई फक्त देखावा असल्याने नागरिकांत असंतोष पसरला आहे.

रावेर तालुक्यात जेवण्याच्या ढाब्यावर रात्रीच्या वेळी अवैध दारू विक्रीला पुन्हा सुरुवात झाली आहे. मागील दोन आठवड्यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक टेंगळे यांनी चार ढाब्यावर कारवाईचा देखावा केला नंतर कारवाईत ढिलाई होत असल्याने जनतेत प्रचंड नाराजीचा सुर आहे. दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरिक्षक टेंगळे यांचे जाणून- बुजुन दुर्लक्ष होत आहे. टेंगळे रावेर यावल भागाचे निरिक्षक आहे. परंतु ते जळगाव येथून अप-डाऊन करत असल्याने दारू विक्रेते त्यांच्या अप-डाऊनचा लाभ घेऊन रात्रीच्या वेळेस सर्रास दारू विक्री करत असतात. तत्पूर्वी अवैध दारू विक्री संदर्भात ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ने बातमी प्रसिध्द केली व अवैध दारू विक्रीवर शिक्कामोर्तब झाले होते. नंतर निरिक्षक यांनी छापा टाकत चार ढाब्यावर कारवाई केली होती. परंतु नंतर जेवणाच्या ढाबे विक्रेत्यांना दारू विक्री करण्यासाठी ढिलाई दिली जात असल्याचा आरोप होत आहे. पाल, खिर्डी, विवरे खुर्द, चिनावल, परीसरात सुध्दा अवैध दारू विक्री केली जात आहे.

Protected Content