कौटुंबिक वाद : जावईकडून सासू, सासरे आणि पत्नीला केली मारहाण !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील रूपजी नगरात राहणाऱ्या सासू सासरे आणि पत्नीला कौटुंबिक वादातून जावई व व्याही यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना २१ मार्च रोजी सकाळी १० वाजता घडली. याप्रकरणी बुधवारी २७ मार्च रोजी रात्री ८ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संजय भोई हे पत्नी शोभाबाई संजय भोई यांच्यासह अमळनेर शहरातील रूपजी नगरात वास्तव्याला आहे. त्यांची मुलगी दिपाली यांचे लग्न धुळे येथील सागर आनंदा साटोटे यांच्याशी झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय भोई यांची मुलगी दिपाली साटोटे आणि नातू कार्तीक सोबत माहेरी रूपजी नगरात आलेल्या होत्या. दरम्यान २१ मार्च रोजी सकाळी १० वाजता जावई सागर आनंदा साटोटे आणि व्याही आनंदा मडकू साटोटे हे चारचाकी गाडीने अमळनेरातील रूपजी नगरात दिपालीच्या माहेरी आले. त्यावेळी नातू कार्तीकला घेवून जाण्याचे असे सांगितले. त्यावर दिपालीची आई शोभाबाई भोई यांनी सांगितले की मुलगा अजून लहान आहे. तेा आईशिवाय राहू राहत नाही. त्यामुळे त्याला घेवून जावू नका असे सांगितल्याचा राग आल्याने जावई सागर साटोटे आणि व्याही आनंदा साटोटे यांनी संजय भाई, शोभाबाई भोई आणि मुलगी दिपाली साटोटे यांना बेदम मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर बुधवारी २७ मार्च रोजी रात्री ८ वाजता शोभाबाई भोई यांनी अमळनेर पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार जावई सागर साटोटे आणि व्याही आनंदा साटोटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहे.

Protected Content