पुनगाव रस्त्यावर बिबट्याचे पुन्हा दर्शन; प्रसंगावधनाने तरूण बचावला

bibtya

धानोरा (प्रतिनिधी)। जळगाव-पुनगाव रस्त्यावर असलेल्या वीट भट्टीजवळ शनिवारी रात्री 8 वाजता पाणी पित असतांना बिबट्या एका तरूणाला दिसून आला. मात्र बिबट्या अंगावर येत असल्याचे पाहून तरूणाने आपल्याजवळील वाहन वेगाने पळवून स्वत:चा जीव वाचविला. पुन्हा बिबट्याचे दर्शन हे धोकेदायक असुन त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

जळगाव रस्त्याला लागुन पुनगाव येथे नेहमीप्रमाणे शनिवारी 8 जून रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास आपल्या घरी जाणारा तरुण आकाश सुनिल बाविस्कर हा याच रस्त्यावरील वीट भट्याजवळ लहान पाण्याच्या टाकीजवळ भला मोठ्या बिबट्या पाणी पित असतांना दिसला. यातच तो आडवा झाला व आकाशकडे वळत असतांना त्याने लागलीच आपली गाडी वेगात पळवून आपला जीव वाचविला.

गेल्याच आठवड्यात याच भागात मितावली, पारगाव शिवारात बिबट्याने दशहत माजवली होती. तर धानोरा येथिल शिव रस्त्यावर एका ट्रक्टरचालकला हा बिबट्या दिसला होता. तरी याबाबत वारंवार वनविभागाला सुचना देऊनही कुठलीही अंमलबजावणी होत नसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे शेतीशिवारात शेती मशागतीचे कामकाज सुरु असल्याने स्त्रीया, लहान मुले, पुरुष दिवस-रात्र शेतातच आहे. बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

वनविभाग सुस्त
गेल्या आठवड्यात बिबट्याने मितावली, पारगाव, मोहरद शिवारात प्राण्यांवर हल्ला चढवला होता. तसेच मोहरद येथिल एका शेतक-यावर हल्ला चढवुन जखमी केले होते. वारंवार बिबट्या दिसतो आहे. मात्र यावर कुणीही काहीच करत नाही आहे.तसेच स्थानिक वनविभागाकडून कुठलीही कार्यवाही झालेली नसल्याने येथिल ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा धारण केलेला आहे.तरी लवकरच या हिंस्त्र बिबट्याच्या मुसक्या आवडाव्यात अशी मागणी होत आहे.

Add Comment

Protected Content