चिंचाळा येथे लाखोच्या बनावट बियाणे जप्त; कृषी विभागाची कारवाई

यवतमाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात सध्या बनावट बियाणांचा काळा व्यवसाय सुरू आहे. यासंदर्भात कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. यवतमाळ जिल्हयातील मारेगाव तालुक्यामधील चिंचाळा येथे बनावट बीटी कपाटीच्या बियाण्यांची विक्री होत आहे अशी माहिती कृषी विभागाला मिळाली होती. अखेर सापळा रचून या माहितीच्या आधारे कृषी विभागाने एक लाखांहून अधिक रूपयांचे बोगस बियाणे जप्त केल्या आहे.

मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथील काही व्यक्ती बोगस बियाणांची विक्री करत असल्याची माहिती जिल्हयाचे कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे यांना मिळाली होती. त्यांनी या माहितीच्या आधारे कारवाई करून ७८ बोगस बियाण्यांचे पाकीट जप्त केले आहे. याप्रकरणी मारेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी विलास चिकटे याला अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या बोगस बियाणांच्या पाकिटावर ८६३ रूपये किंमत लिहाली असल्याने या किंमतीनुसार त्यांची एकूण किंमत ही एक लाख एक हजार इपये इतका आहे. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पोलीस सध्या पुढील कायदेशीर प्रक्रिया करत आहेत.

Protected Content