तलावात बुडाल्याने तरुण बेपत्ता; शोध कार्य सुरू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे तलावामध्ये भुलाबाई विसर्जन करीत असताना रमेश भिका चव्हाण (वय-४० रा. वसंतवाडी, ता. जि.जळगाव) या इसम पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. घटनास्थळी महसूल व पोलिस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले होते. रात्रीपर्यंत इसमाचा शोध लागला नाही.

जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे भुलाबाई विसर्जनासाठी सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता मुली गेलेल्या होत्या. त्या ठिकाणी रमेश चव्हाण हे काठावरून भुलाबाई घेऊन पाण्यात नेत होते. काही भुलाबाईंचे विसर्जन झाले व नंतर चव्हाण हे पाण्यात बुडून बेपत्ता झाले.

या विषयी जिल्हा दूध संघाचे संचालक रमेश जगन्नाथ पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व प्रशासनाला माहिती दिली. त्या वेळी नायब तहसीलदार दिलीप बारी व त्यांचे सहकारी तसेच म्हसावद पोलिस चौकीचे पोकॉ हेमंत पाटील, प्रदीप पाटील हे घटनास्थळी पोहचले. इसमाचा शोध घेण्यात आला. मात्र ते न सापडल्याने सकाळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक जाणार आहे.

Protected Content