रावेर शहरात मविआचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ रॅली

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत माजी आमदार अरुण पाटील, माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, पक्षाचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद जाफर मोहम्मद, प्रल्हाद महाजन, डॉ राजेंद्र पाटील, योगीराज पाटील,किशोर पाटील, हरीश गनवाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत योगेश गजरे, राजीव सवर्णे, जगदीश घेटे, मेहमूद शेख, सोपान साहेबराव पाटील, योगेश पाटील, सादिक मेंबर, डॉ सुरेश पाटील, डी एस चौधरी सर, शीतल पाटील, दिलीप कांबळे, सुरेश चिंधू पाटील, दीपक पाटील, विजय गोटीवाले, ज्ञानेश्वर महाजन, अविनाश पाटील, धुमा तायडे, ऍड आर आर पाटील, असद मेंबर, अय्युब मेंबर, उमेश गाढे, सुनील कोंडे, महेश लोखंडे, गयास शेख, युसुफ शेख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती नोंदवली होती.
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून महालक्ष्मी मंदिरात त्यांनी पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला त्यांनी समाजाचे अध्यक्ष नितीन महाजन यांच्यासह पुष्पहार अर्पण केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला यांच्यासह अभिवादन केले. यावेळी मावळा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बोरकर, पीपल्स आर्मीचे असंख्य कार्यकर्ते आणि अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय चौधरी यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

Protected Content