पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जारगाव शिवारातील गोडावूनमधून बोगस रासायनिक खतांच्या विक्रीचा कृषी खात्याच्या पथकाने पर्दाफाश केला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, पाचोरा शहरालगत असलेल्या जारगाव शिवारात एका व्यक्तींच्या गोडावून मधे गुजरात येथील मिल्सन फार्मास कंपनीने तयार केलेल्या बोगस रासायनिक खतांची विक्री गावोगावी जावून विक्री होत असल्याची माहिती जळगाव येथील कृषी विभागाचे नियंत्रक अरुण तायडे यांना गुप्त माहिती मिळाली होती. या अनुषंगाने पाचोरा येथील उपविभागीय कृषी अधिकारी नंदकिशोर नयनवाड, पाचोरा पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम एस भालेराव,अरुण तायडे सह पाच जणांच्या पथकाने अचानक जारगाव येथील मधूकर शंकर भोकरे (वाणी) राहणार शिवाजी नगर पाचोरा यांचे मालकीचे गोडावूनवर अचानक छापा टाकला.
या छाप्यात सदरगोडावून मधे २० लाख १९ हजार रुपये किमतीचे ७टन बोगस रासायनिक खते आढळून आली. दरम्यान, गोडावून मालक मधूकर भोकरे हे फरार झाले असून त्यांनी हे
गोदाम बिहार राज्यातील रहिवासी असणार्या दोन युवकांना भाड्याने दिले असल्याचे समजते. हे दोन परप्रांतीय युवक शेतकर्यांना गावोगावी जावून बोगस खते विक्री करत असल्याचे कृषी अधिकारी एम. एस. भालेराव यांनी सांगितले. कारवाई पदकाने सात टन बोगस रासायनिक खते ताब्यात घेतले असून पाचोरा येथील पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तसेच या कारवाईत बिहार येथील दोन युवक फरार असल्याचे भालेराव यांनी सांगितले.