पाचोऱ्यातील त्या खुनाच्या प्रकरणात पत्नीच्या फिर्यादीवरून दोघ मुलांविरुध्द गुन्हा दाखल

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा शहरातील भास्करनगर भागात कौटुंबिक वादातून प्रौढाची चाकूने वार करुन खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेत मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून दोघं मुलांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आज सोमवार, दि. ११ रोजी न्यायालयात हजर केले असता शहरातील भास्कर नगर येथे राहत असलेला संजय बंकट खेडकर (वय – ४६) हा राहत्या घरी कुलर बनविणे व दुरुस्ती करणे आणि विक्री करणेचा व्यवसाय करीत पत्नी, दोन मुलांसह संसाराचा गाडा ओढत होता. किरकोळ कारणावरून नियमित त्याचे पत्नीशी वाद होत असत.

दि. ९ एप्रिल रोजी शनिवारी रात्रभर पती पत्नीमधे भांडण झाले होते. दरम्यान नेहमीच्या होणाऱ्या भांडणास कंटाळुन मनोज संजय खेडकर, प्रतिक संजय खेडकर यांनी चाकूने वार करुन त्याला हत्या केली. या प्रकरणी पाचोरा पोलिसांनी दोघ आरोपींना ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे हे करित आहे.

Protected Content