फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | महाराष्ट्रात लोकाभिमुख नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी सरकार स्थापनेचा ऐतिहासिक फैजपूर शहरात भाजपा कार्यकर्त्यांनी व मतदारांनी स्वातंत्र्य सेनानी सुभाष बाबू बोस चौकात ढोल ताश्यांच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव जल्लोष करण्यात आला.
याप्रसंगी ओबीसी प्रदेश सचिव भरतभाऊ महाजन, प्रदेश सदस्य बी.के.चौधरी, शहराध्यक्ष अनंता नेहेते, सरचिटणीस संजय सराफ, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी शेख आरिफ, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष पिंटूभाऊ तेली, शिक्षक आघाडी जिल्हा सदस्य राजेश महाजन, ता.उपाध्यक्ष नितीन नेमाडे -किशोर पाटील, युवा मोर्चा ता उपाध्यक्ष प्रतिक वारके – वैभव वकारे – सुभाष (रामा )होले, मेडिकल असो तालुकाध्यक्ष अनिरुद्ध सरोदे, शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर वाघूलदे, दिव्यांग आघाडी तालुकाध्यक्ष नाना मोची, महिला शाखाध्यक्ष जयश्री चौधरी, युवा मोर्चा शाखाध्यक्ष श्याम भंगाळे, आदिवासी आघाडी शाखाध्यक्ष रशिद तडवी, युवराज चौधरी, भूषण चौधरी, रवींद्र सरोदे यासह भाजप व हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.