महाराष्ट्र बँक शेलवड येथून स्थलांतरित होऊ नये यासाठी खासदारांचे निवेदन

दिल्ली लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार रक्षाताई खडसे यांनी आज दिल्लीमध्ये वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची कार्यालयात भेट घेऊन ‘बँक ऑफ महाराष्ट्र शेलवड ब्रँच बोदवड तालुका ही शेलवड येथून स्थलांतरित करू नये.’ म्हणून निवेदन दिले.

वित्त राज्य मंत्री डॉ भागवत कराड यांना रक्षाताई यांनी शेलवड ब्रँच बँक ऑफ महाराष्ट्रबद्दल माहिती दिली. या बँक शाखेमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची खाती आहेत. शेलवडच्या परिसरातील जवळपासची दहापेक्षा जास्त गावांतील लोकांची अकाउंट्स अनेक वर्षांपासून सुरू आहेत. या बँकेत मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांची डिपॉझिट असून शाखेतील सर्व खाती बोदवड या बँक ऑफ महाराष्ट्र येथे नव्याने सुरू केलेल्या बँकमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी प्रस्तावित आहे.

शेलवड व परिसरातील गावांतील लोकांची ही शाखा शेलवड येथेच कार्यरत राहावी. असा आग्रह होता. जेणेकरून त्यांना बँक व्यवहार करण्यासाठी वारंवार बोदवड येथे जाणे जिकरीचे व खर्चिक झाले असते. त्यांचप्रमाणे या शाखेत महिलांची अकाउंट्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना नाहक जाण्यायेण्याचा त्रास सहन करावा लागला असता. ह्या सर्व बाबीचा विचार करत ही बँक शेलवड येथुन स्थलांतरित होऊ नये म्हणुन खासदार रक्षाताई यांनी मागील पाच सहा महिनी पासुन बँकेच्या मुख्य कार्यालयात तगादा लावला होता.

सर्व माहिती अवगत झाल्यावर वित्त राज्यमंत्री यांनी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या मुख्य कार्यालयात Executive डायरेक्टर विजयकुमार यांच्याशी संपर्क करून शेलवड येथील कार्यरत बँक ऑफ महाराष्ट्र ब्रँच बोदवड येथे स्थलांतरित करू नये अशा सुचना दिल्या. त्यामुळे शेलवड येथील सध्या कार्यरत असलेली बँक ऑफ महाराष्ट्रची ब्रँच आता शेलवड येथेच कार्यरत राहील. अशी ग्वाही वित्त राज्यमंत्री डॉ. कराड यांनी रक्षाताई खडसे यांना दिली.

Protected Content