फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी | मधुकर सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा विषयाला रविवारी झालेला ऑनलाइन वार्षिक सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन शरद महाजन होते. तर आमदार शिरीष चौधरी यांची विशेष उपस्थिती होती.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात या ऑनलाईन सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला मोठ्या प्रमाणावर सभासद जोडले गेले होते. यावेळी विषयपत्रिकेवरील सर्व दहा विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली त्यात सर्वात महत्त्वाचा व गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेला कारखाना व आसवनी प्रकल्प भाडेतत्त्वावर अथवा सहयोगी, भागीदारी तत्वावर देऊन तो सुरू करण्याच्या विषय क्रमांक नऊ ला सर्वांनी मंजुरी दिली. या विषयावर चेअरमन शरद महाजन व संचालक नरेंद्र नारखेडे यांनी विस्तृत माहिती देताना दोन वर्षापासून कारखाना बंद आहे प्रचंड आर्थिक अडचणी आहे शेतकर्यांची एफ आर पी ची रक्कम व अन्य देणी थकली आहे त्यात दोन वर्षापासून निसर्गाचाही असहकार आहे. त्यामुळे संचित तोटा १०३ कोटींवर जाऊन पोहोचला आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी भाडे तत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी चे साखर आयुक्तांच्या मार्गदर्शक तत्वानुसार लेखा परिक्षण व आर्थिक रोड मॉडेल तयार करणे या प्रक्रिया पूर्ण झाल्या असून वार्षिक सभेची मंजुरी मिळाल्यावर या विषयाला चालना मिळेल व भविष्यात पूर्ण शक्तीने कारखाना सुरू करण्याच्या कार्याला वेग देऊ अशी ग्वाही दिली दिली.
यावेळी काही सभासदांनी ऑनलाइन सभेतील चर्चेत सहभाग नोंदवत आमचा आजही मधुकर विश्वास आहे आता ऊस लावून ठेवलेला आहे मभूतकाळाचा विचार न करता वर्तमानाचा विचार करून कारखाना सुरू करा व शेतकर्यांचे भविष्य उज्ज्वल करा अशा संवेदना व्यक्त केल्या. तर, पक्ष वेगळा असला तरी चेअरमन शरद महाजन व आम्ही कारखाना हितासाठी एकत्र आहोत अशी ग्वाही आमदार शिरीष चौधरी यांनी या सभेत दिली.
चेअरमन शरद महाजन व आमचा पक्ष वेगळा असला तरी आमच्यात कुठलाच बेबनाव अथवा मतभेद नाही हे सुरुवातीला स्पष्ट करत आमच्या वाडवडिलांनी सुरू केलेला प्रकल्प जिवंत ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे त्यापासून आम्ही पळ काढणार नाही. पक्ष वेगळा असला तरी कारखान्याच्या हितासाठी आम्ही एकत्र आहोत. केंद्र सरकारने सहकार विभाग नुकताच सुरू केला आहे त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कारखाना सुरू करण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली.
माजी आमदार अरुण पाटील यांनी बाळासाहेब मधुकरराव चौधरी व दादासाहेब जे. टी. महाजन यांनी ज्या ध्येयधोरणतून कारखाना सुरू केला त्या ध्येयापासून दूर न जाता सर्व घटकांच्या हितासाठी कारखाना सुरू करण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली. जि. प. सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी ज्या माध्यमातून प्रकल्प लवकर सुरू होईल त्यावर लक्ष केंद्रित करावे व येणारा हंगाम मधुकर सुरू करावा अशा सदिच्छा देत भाडेतत्वाच्या विषयाला पाठिंबा दर्शविला.
या ऑनलाइन बैठकीत विषयपत्रिकेवरील सर्व विषय यांसह नफा-तोटा पत्रक स्वीकारणे, सभासद भाग भांडवल दहा हजाराहून पंधरा हजार करणे, सध्याचे मूल्यांकन कमी असल्याने पुनर्मूल्यांकन करणे ,हंगाम २०१९/ २० च्या शिल्लक असलेल्या साखर साठ्याची विक्री करणे या विषयांना मंजुरी देण्यात आली
बैठकीला माजी आमदार रमेश चौधरी, जिल्हा बँक संचालक गणेश नेहते, कामगार युनियनचे अध्यक्ष किरण चौधरी,पंचायत समिती सदस्य शेखर पाटील यांच्यासह सर्व संचालकांची उपस्थिती होती कार्यकारी संचालक शंकर पिसाळ यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले प्रभारी मुख्य लेखाधिकारी रत्नदिप वायकोळे यांनी मागील सभेचे इतिवृत्त मांडले मांडले. आभार प्रदर्शन व्हाईस चेअरमन भागवत पाटील यांनी केले.
कार्यकर्त्यांचे निवेदन
दरम्यान, शेतकरी व कामगारांच्या हितासाठी भाडेतत्वाच्या या निर्णयाला सर्वांची संमती मिळाल्यानंतर जे ही प्रस्ताव सक्षम असतील या प्रस्तावाची शहनिशा करून आमदार शिरीष चौधरी यांना विश्वासात घेऊनच चेअरमन व संचालक मंडळ यांनी निर्णय घ्यावा संचालक मंडळाने आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विजय संपादन केल्यानंतर कारखान्याची परिस्थिती व आता सात सात वर्षानंतर ची परिस्थिती सभासदांच्या अवलोकना साठी सविस्तर प्रसिद्ध करावी जेणेकरून शेतकरी व कामगार, सभासद यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण राहणार नाही असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर पं स सदस्य शेखर पाटील, नगरसेवक केतन किरंगे, चंद्रकांत भंगाळे, प्रसन्न महाजन, विकास पाटील, धीरज कुरकुरे, धीरज पाटील, अभय महाजन यांच्या स्वाक्षर्या होत्या.