पाटणादेवी येथे पूजा साहित्य विक्रीची परवानगी द्यावी-खा. पाटील यांना साकडे

चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यातील पाटणादेवी येथील दुकानदारांना पुजेचे साहित्य विक्री करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी तेथील दुकानदारांनी केली असून यासाठी खासदार उन्मेषदादा पाटील यांना साकडे घातले आहे.

तालुक्यातील पाटणादेवी हे पर्यटन स्थळ सध्या भाविकांच्या दर्शनासाठी उघडण्यात आलेले आहे. मात्र येथे परंपरागत गेल्या अनेक वर्षांपासून नारळ गुलाल हार खण ओटी हे पूजेचे साहित्य तसेच चहापान नाश्ता विकणाऱ्या दुकानदार बांधवांना दुकाने लावण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. सध्या सर्वत्र कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याने गेल्या तीन पिढ्यांपासून या परिसरात व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना दुकाने लावण्याची अटी शर्तीनुसार परवानगी द्यावी. या दुकानदारामुळे येणाऱ्या भाविकांची सोय होणार असून दूरवरून आलेल्या भाविकांना चहापान ,पूजेचे सामान मिळत नसल्याने येथे श्रीक्षेत्र पाटणादेवी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे. येथील दुकानदारांसह येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर निवेदन,तक्रारी व सुचना मला मिळाल्या असून आपण दोन्ही बाजूंचा विचार करता या दुकानदारांना आपल्या पाटणादेवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्यांच्या परंपरागत जागेत दुकाने पुन्हा सुरू करण्या संदर्भामध्ये परवानगी द्यावी. अशी मागणी आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी वन विभागाला केली आहे.

आज येथील दुकानदार आपली कैफियत घेऊन खासदार जनसंपर्क कार्यालयात खासदार उन्मेश दादा पाटील यांची भेट घेण्यासाठी आले होते. दुकानदारांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांचेशी संपर्क करीत आपले गाऱ्हाणे मांडले. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी विभागीय वनसंरक्षक विजय सातपुते यांना भ्रमणध्वनीद्वारे ही समस्या मांडली यावर आठ दिवसांत त्यांना परवानगी द्यावी अशी मागणी केली.

या दुकानदारांना 1995 मध्ये तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी यांनी या ठिकाणी दुकाने लावण्यासाठी लेखी परवानगी दिली होती. आपण या दुकानदारांच्या परिवाराचा विचार करता त्यांना दुकाने लावण्यासंदर्भात परवानगी द्यावी. या दुकानदारामुळे पर्यटनस्थळात व परिसरात पर्यायाने आपले अनेक दुकानदार बांधव व हे जंगल राखण्याचे व संदर्भात अडीअडचणी सोडवण्यासाठी देखील आपल्या वनविभागास मदत करत असतात. जेथे पोट भरतो त्या परिसराची निगा राखणे संदर्भात त्यांची मानसिकता असून या सर्व बाबींचा विचार करता आपण यांना दुकाने लावण्यासंदर्भात येत्या आठवडाभरात निर्णय घ्यावा. अशी सूचना खासदार उन्मेश भैय्यासाहेब पाटील यांनी आपल्या पत्रात मांडली आहे. यावेळी मागणीचे निवेदन देण्यात आले.

पाटणागावाचे सरपंच नितीन चौधरी, रामकृष्ण देसले, मधुकर चौधरी, संजय खुटे, रावसाहेब दळवी, भगवान चौधरी, शरद धात्रक, आबा चौधरी, बापू चौधरी,अनिल देसले, प्रदीप वाणी, राजू वाघ , सोमेश चौधरी, राहुल धात्रक, आबा सोनवणे, अर्जुन सूर्यवंशी, शंकर चौधरी, समाधान चौधरी, नेताजी मोरकर, दीपक चौधरी, तुषार धात्रक, संतोष चौधरी, गुलाब पवार, विकास चकोर, अक्षय काळे, घनश्याम मोरे, अरुण चौधरी, लक्ष्मण सोनवणे, साहेबराव चौधरी, भाऊसाहेब दळवी, शंकर चौधरी, शशिकांत चौधरी, चेतन काळे, संदीप चौधरी, महेंद्र चौधरी, नितीन सोनवणे आदि दुकानदार बांधव उपस्थित होते.

Protected Content