फैजपूर प्रतिनिधी । फैजपूर पालिकेच्या पाच विषय समित्यांच्या सदस्यांची आज निवड करण्यात आली. या निवडीच्या पीठासीन अधिकारी म्हणून जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे होते.
फैजपूर पालिकेच्या 5 विषय समित्यांच्या सदस्यांची निवड करण्यासाठी आज १ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभा बोलाविण्यात आली होती. यावेळी तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम समिती, पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती, नियोजन व विकास समिती, महिला व बालकल्याण समिती, स्वच्छता विषयक वैद्यकीय सार्वजनिक आरोग्य समिती अशा
पाच समिती सदस्यांची निवड याप्रमाणे
सार्वजनिक बांधकाम समिती सदस्य – शेख कुर्बान, हेमराज चौधरी, मिलिंद वाघूळदे, कलीम खां मण्यार,
पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण समिती – रशीद नसीर तडवी, मिलिंद वाघूळदे, नयना चंद्रशेखर चौधरी, देवेंद्र बेंडाळे,
नियोजन व विकास समिती – प्रभाकर सपकाळे, शकुंतला भारंबे, कलीम खां मण्यार, सायना मलक आबीद,
महिला व बालकल्याण समिती – फातेमा रईस मोमीन, अमिता हेमराज चौधरी, वत्सला रघुनाथ कुंभार, शाहीन परवीनबी शकील खान, नयना चंद्रशेखर चौधरी,
स्वच्छता विषयक वैद्यकीय सार्वजनिक आरोग्य समिती – अमिता हेमराज चौधरी, देवेंद्र बेंडाळे, नफिसा बी शेख इरफान, शाहीन परवीन बी शकील खान
यांची होती उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर पीठासीन अधिकारी म्हणून जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे, नगराध्यक्षा महानंदा होले, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, मुख्याधिकारी किशोर चव्हाण तर सभेला भाजपा गटनेता मिलिंद वाघूळदे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक हेमराज चौधरी, काँग्रेस गटनेता कलीम खां मण्यार यांच्यासह १८ नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते तर विषय समिती सदस्य निवडीचे कामकाज पीठासीन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सभा लिपिक सुधीर चौधरी, वरिष्ठ लिपिक दिलीप वाघमारे, लिपिक संतोष वाणी यांनी काम पाहिले.