फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील धनाजी नाना महाविद्यालयात सुरू असलेल्या युवारंग महोत्सवात तरूणाईच्या कलागुणांचा जबरदस्त अविष्कार दिसून आला आहे.
युवारंग महोत्सवात आज दुसरा दिवस दुसर्या दिवशी संपूर्ण दिवसभर विविध स्पर्धांचा वर्षाव पाहायला मिळाला. आज विविध सादरीकरण करण्यात आले. यात रंगमंच क्रमांक ०१ वर : सकाळी मूक अभिनय व दुपारी तीन नंतर मिमिक्री हे कलाप्रकार सादर करण्यात आले. सकाळी या ठिकाणी मूकनाट्य हा कल्प्रकर सादर करताना मूक अभिनयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अनेक सामाजिक, राजकीय, धार्मिक, शेतकरी आत्महत्या, स्त्रीभून हत्या, हुंडाबळी बालविवाह प्रदूष स्त्रियावर होणारे अत्याचार तसेच शेतकर्यांची आत्महत्या भ्रष्टाचार मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत, गांधीजी के तीन बंदर, माध्यमांमुळे विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार , शाळा महाविद्यालय अशा विविध ठिकाणी होणार्या विविध घटनांवर मूक अभिनयाच्या माध्यमातून प्रकाश टाकला
रंगमंच क्रमांक ०२ वर पाश्चिमात्य समूह गायनसाठी ०५, पाश्चिमात्य सोलो गायनसाठी १२, आणि पाश्चिमात्य वाद्य संगीत यासाठी ०६ स्पर्धक संघांनी भाग नोंदविला. एकूण तीन स्पर्धांमध्ये स्पर्धा भरण्यात आली होती या स्पर्धेत पाश्चिमात्य गीतांच्या माध्यमातून मैफिलीला रंग देण्यात आली. वेगवेगळ्या प्रकारचे बॉलिवूड आणि हॉलिवूडचे गाणे या ठिकाणी अत्यंत मधुर आवाजात गायले गेले. गायन आणि पाश्चात्य सोलो गायन या दोन्ही स्पर्धा मधील सहभागी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने आपली गायनाची कला सादर केली
रंगमंच तीन रंगमंच ०३ : आज अतिशय बौद्धिक विचारांनी भरलेला दिसला रंग म्हणजे तीन वर वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी ६१ विद्यार्थी अनुकूल आणि प्रतिकूल या दोन्ही बाजूने बोलत बोलत होते या स्पर्धेसाठी देण्यात आलेला विषय हा भारतीय राज्यघटनेनुसार भारतात लोकशाही अमलात आहे का ? हा विषय होता. यात स्पर्धक विद्यार्थ्यांनी अतिशय उस्फूर्तपणे आणि वैचारिक मांडणी करताना दिसले. प्रतिकूल बाजूने बोलत असताना विद्यार्थ्यांनी तेवढेच प्रभावीपणे तर्क मांडले.
रंगमंच ४ वर भारतीय सुगम संगीत, व भारतीय शास्त्रीय गायन हे कलाप्रकार सादर करण्यात आला या कलाप्रकारात अनुक्रमे ३० व ११ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला या सर्व महाविद्यालयांच्या स्पर्धकांनी भारतीय सुगम संगीत या भारतीय सुगम संगीतातल्या वेगवेगळ्या चालीवर विविध राग सादर करत आपली कला सादर केली.
रंग क्रमांक पाचवर तीन वेगवेगळ्या प्रकारच्या कला सादर करण्यात आल्या. त्यात एक चिकट कला, माती कला आणि इन्स्टॉलेशन अशा तीन कला प्रकारांमध्ये सादरीकरण करण्यात आले. यामध्ये चिकट कलेसाठी ३५ स्पर्धक संघ माती कलेसाठी ३२ स्पर्धक संघ आणि इन्स्टॉलेशन साठी ४० स्पर्धक संघांनी भाग नोंदविला चिकट कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भारतीय एकात्मता विविधतेतून म्हटलेला भारत निसर्ग चित्र व्यंगचित्रे अशा विविध प्रकार सादर केले, माती कलेतून मदतीसाठी उगवलेले हात प्रेम संबंध विविध प्रकारच्या मुद्रा शृंगार रस मातृत्व वात्सल्य असे अनेक प्रकारच्या कला मूर्तिमंत उभारून आपल्या कलेचे प्रदर्शन केले.