चिंचोलीकर डॉ. भुषणकुमार साठेंचा विश्व फार्मसी दिनी सन्मान

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी व सध्या वर्धा येथील शासकीय अनुदानित फार्मेसी महावियालयचे प्राचार्य डॉ. भुषणकुमार साठे यांना नुकताच नाशिक येथे अतुल अहिरे, अध्यक्ष महाराष्ट्र फार्मेसी स्टेट कौन्सिल मुंबईयांनी त्यांचे कार्य व फार्मेसी क्षेत्रातील उल्लेखनीय काम व विश्व फार्मेसी दिवस रोजी केलेले उल्लेखनीय कार्य या बद्दल सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ. भुषणकुमार साठे यांचे फार्मेसी क्षेत्रात १२ पुस्तके, ४६ शोधनिबंध, ३७ नैशनल इंटरनेशनल कांफ्रेंसमध्ये साधरिकरण आहे. प्राचार्य डॉ भूषणकुमार साठे यांना २०१८ चा फार्मा रत्न पुरस्कार दिल्ली येथे मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य औषध परिषद मार्फत घेण्यात आलेल्या फार्मेसी ट्रेनिंग प्रोग्राम यात त्यांचा प्रामुख्याने विविध विषयांवर मार्गदर्शक म्हणुन बोलण्यासाठी डॉ साठे यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हिंगणघाट, रावेर, वर्धा या ठिकाणी ट्रेनिंग मध्ये एंटीबायोटिक रेसिस्टटँस औषध स्टोरेज कंडीशन आणि प्रामुख्याने पेशेंट काउन्सेलिंग रुग्णांना समुपदेशन करण्याचे आवर्जून करण्यास सांगितले होते.

एंटीबायोटिक औषधांचा वापर खूप होत असल्याने गरज असेल तरच रुग्णांना द्यावे असे ही त्यांनी सर्व डॉक्टर आणि फार्मासिस्ट ला उद्देशून यावेळी सांगितले व जास्त एंटीबायोटिक वापरणे खूप चिंतेची बाब आहे असे ही त्यांनी सांगत आता कोरोना नंतर चे खोकले अझिथ्रोमीसिन एंटिबायोटिक औषध ने सुद्धा थांबत नाही. याचा अर्थ खूप अति प्रमाणात हे कोरोना काळात वापरले गेल्याने त्याला रेजिस्टेंस आला आहे. त्यामुळे आपण फार्मासिस्ट म्हणून आपली खूप मोठी जबाबदारी आहे व आपण रुग्णांना फक्त औषध विकण्यापुरते सिमीत नसुन त्यांना सर्व डॉक्टरांनी दिलेल्या औषधी बद्दल सांगणे आपले आद्य कर्तव्य आहे .असे ही त्यांनी यावेळी सांगितले होते व एंटीबायोटिक वापर बदल फार चिंता व्यक्त केली होती. प्रिस्क्रिप्शन एरर वर ही प्राचार्य डॉ साठे बोलताना सांगितले की डॉक्टरांनी जर औषध घेण्याचे आदेश सुटसुटीत लिहले तर फार्मासिस्टला रूग्णांना औषधी देण्यास चुकी होणार नाही व पुढील होणारे दुष्परिणाम ही थांबतील .यात जर फार्मासिस्टला प्रिस्क्रिप्शन वाचता आले नाही तर त्याने डॉक्टरांचा लगेच सल्ला घेतला पाहिजे जेणे करून रुग्णांना योग्य व हवे तेच औषधे चांगल्या पद्धतीने दिले जाईल.

डॉ. साठे यांनी त्यांच्या पीएचडी दरम्यान विविध प्रकारच्या कॅन्सर कर्करोगावर अभ्यास करून संशोधन केले आहे. तसेच टीबी या आजारांवर ही अभ्यास केला आहे .तरी डॉक्टर साठे यांचे कार्य कौतुकास्पद असून ते मूळ चिंचोली तालुका यावल येथील रहिवासी असून त्यांचे वडील एका शेतकरी कुटुंबातील असून एका शेतकरी कुटुंबातून उदयास आलेले प्राचार्य डॉ.भुषणकुमार साठे यांना नुकताच नाशिक येथे अतुल अहिरे, अध्यक्ष महाराष्ट्र फार्मेसी स्टेट कौन्सिल मुंबई (महाराष्ट्र) यांनी त्यांचे कार्य व फार्मेसी क्षेत्रातील उल्लेखनीय काम व विश्व फार्मेसी दिवस , रोजी केलेले उल्लेखनीय कार्या बद्दल सन्मानित करण्यात आले.

Protected Content