प्रयागराज कुंभमेळ्यात फैजपूर भाविकांचा शाहीस्नानात सहभाग

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर येथील डिंगंबर महाराज चिनवालकर मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे आणि टीएमई सोसायटीचे अध्यक्ष शरद महाजन यांच्या नेतृत्वाखाली फैजपूर व न्हावी येथील सुमारे २५ भाविक प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी झाले. २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्या पर्वकाळात भव्य शाहीस्नान पारंपरिक पद्धतीने संपन्न झाले.

कुंभमेळ्यात अत्यंत महत्त्वाचे सहा आखाडे मानाचे मानले जातात. यापैकी संतोषी निर्मोही आखाडा एक प्रमुख आखाडा असून, या आखाड्याच्या शाहीस्नानात फैजपूर व न्हावी येथील भाविकांना मानाचे स्थान प्राप्त झाले. आखाड्याचे सर्व साधू-संत यांच्या समवेत मोठी शाही मिरवणूक काढण्यात आली. त्रिवेणी संगमावर साधूसंतांच्या उपस्थितीत शाहीस्नान पार पडले.

यावेळी निर्मोही आखाड्याचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री महंत राजेंद्रदास जी महाराज, श्रीराम मंदिर आखाड्याचे प्रमुख महंत भरतदास जी महाराज आणि वैष्णव आखाड्याचे प्रमुख जगद्गुरु वल्लभाचार्य जी महाराज यांच्या सान्निध्यात भाविकांना शाहीस्नान करण्याचा बहुमान मिळाला. ही संधी डिंगंबर महाराज चिनवालकर यांच्या आशीर्वादामुळे मिळाल्याची भावना नरेंद्र नारखेडे यांनी व्यक्त केली.

यावेळी शेतकी संघ संचालक धनराज फिरके, अनिल नारखेडे, उमेश बेंडाळे, सुनील नारखेडे, चंद्रकांत चौधरी, दीपक भंगाळे, किरण चौधरी, गणेश पाटील, शेखर चौधरी, सी. के. चौधरी, शीतल महाजन, पराग वाघूळदे, विलास नेमाडे, किशोर नारखेडे, मुकुंद भंगाळे यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते. भाविकांनी साधू समाजासाठी मोठा भंडारा आयोजित केला. तसेच कुंभमेळ्यात उभारण्यात आलेल्या जगन्नाथ धामला भेट देऊन महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज यांच्या आखाड्याला भेट दिली. तेथील साधू-संतांचे दर्शन घेऊन संत पूजन करण्यात आले.

Protected Content