फैजपूरसह परिसरात ढोल ताशाच्या गजरात दुर्गा देवीमातेची घटस्थापना

renuka mata

फैजपूर, प्रतिनिधी | शहरासह पोलीस ठाणे हद्दीत ६८ दुर्गोत्सव मंडळाची भक्तिमय वातावरणात घटस्थापना करण्यात आली. नवरात्रोत्सवाचे महत्व लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

गेल्या पंधरवड्यापासून नवरात्रोत्सवनिमीत्त फैजपूर शहरात दुर्गोत्सव मंडळाचे कार्यकर्ते शेड उभारणीसह विविध प्रकारचे आरास व देखावे तसेच आकर्षक रोषणाईच्या तयारीला लागले होते. आज फैजपूर शहरासह फैजपूर पोलीस ठाणे हद्दीत ढोलताशांच्या गजरात व भक्तिमय वातावरणार घटस्थापना करण्यात आली. त्यात फैजपूर शहरासह  भालोद, बामणोद ,पाडळसा, हिंगोणा, हंबर्डी, कोसगाव, कासवे, विरोदा, पिंपरुड, दुसखेडा असे फैजपूर पोलीस ठाणे हद्दीत एकूण ६८ दुर्गोत्सव मंडळाची मोठ्या उत्साहात घटस्थापना करण्यात आली. दरम्यान नवरात्रोत्सवाचे महत्व लक्षात घेता फैजपूर उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, फैजपूर पोलिस ठाण्याचे गोपनीय पोलीस यशवंत टहाकळे, मोहन लोखंडे तसेच ३८ पोलीस व २५ होमगार्ड असा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे .

Protected Content