फैजपूरात जुगार अड्ड्यावर धाड; पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

crime 7 1

फैजपूर प्रतिनिधी । यावल तालुक्यातील फैजपूर तलाठी कार्यालयाजवळील जवळील एका दुर्गोत्सव मंडळाच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलीसांनी धाड टाकत 13 जुगाऱ्यांसह पावणे दोन लाखाच्या रोख रकमेसह मोबाईल व मोटरसायकल असा एकूण तीन लाख 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे जुगारांचे ढाबे दणाणले आहे.

फैजपूर शहरातील तलाठी कार्यालयाजवळील शिवनेरी दुर्गा मंडळाजवळ आडोशाला रीकाम्या घरात जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधीक्षक नवटके यांना मिळाल्यावरून त्यांच्या पथकाने ही धाड टाकत कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एक लाख 68 हजार 740 रुपयांची रोकड, 66 हजार 200 रुपये किंमतीचे 10 मोबाईल, एक लाख 35 हजार किंमतीच्या पाच मोटार सायकली असा एकूण तीन लाख 69 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी संशयीत आरोपी रवींद्र तुकाराम सरोदे, विश्वनाथ रामदास शिंदे (रा.तळेगाव), सैय्यद अलीम सय्यद महेबूब, राहुल जयंतराव चव्हाण, अनिल बाबू काठे, दुर्गादास डिंगबर भंगाळे (सर्व रा.सावदा), उदय उर्फ अप्पा बाबूराव चौधरी, शेख शकिर शेख शब्बीर, रीजवान अली कासम अली, अय्युब खान शब्बीर खा, (सर्व रा.फैजपूर), सैय्यद रफिक सय्यद शब्बीर, चांद खा बाबू तडवी (रा.भालोद), भालचंद्र काशिनाथ शिंदे, सुरेश लक्ष्मण ठोकरे (रा.गाते) अशा चौदा जणांविरुद्ध कॉन्स्टेबल विजय नामदेव सोनवणे यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी 13 जणांना अटक करण्यात आली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहेत.

Protected Content